{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
मका काढताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; भागदरा गावावर शोककळा
जामनेर तालुक्यातील घटना; पत्नी, दोन मुले आणि एका मुलीसह कुटुंब उघड्यावर
जामनेर : जामनेर तालुक्यातील भागदरा येथे मका काढण्याचे काम सुरू असताना मशीनमध्ये अडकून योगेश भावालाल पाटील (वय ३५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास घडली. स्वतःच्या मालकीच्या मशीनद्वारे शेतीकाम करत असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश पाटील हे शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून ते मका काढण्याचे मशीनही चालवत होते. कष्ट करून कुटुंबाला आधार देणाऱ्या योगेश यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या या कष्टकरी कुटुंबाचा आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे भागदरा गावात शोककळा पसरली असून, तीन लहान मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.