प्रतिनिधी: महेशप्रसाद दिक्षित, जामनेर (जि. जळगाव)
जामनेर – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, जामनेर तालुक्याचे आदरणीय आमदार व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ श्री गिरिषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त, 16 मे 2027 रोजी सुरेशदादा जैन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी सहभागी होऊन समाजोपयोगी कार्यात हातभार लावला.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील, संचालक श्री चंद्रकांत देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात सर्व विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. शिंपी सर यांनी केले, तर समन्वयक म्हणून प्रा. आर. बी. चव्हाण सर यांनी जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मनोज बारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक काम करून शिबिर यशस्वी केले.
शिबिराद्वारे रक्तदानाची प्रेरणा दिली गेली आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली, अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली.