जामनेर — जामनेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालय परिवाराच्या वतीने ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. आर. एस. खडायते यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. भिमराव क्षीरसाठ यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, याचा उल्लेख करण्यात आला.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही महात्मा फुले यांना आदर्श मानल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रा. अतुल साबद्रा यांनीही महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य डी. एस. पाटील, रा. से. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रविंद्र वाघ, प्रा. डॉ. अंशुमन मिश्र, प्रा. डॉ. ए. आर. पाटील, प्रा. डॉ. वर्षा मानवतकर, प्रा. मनिषा चौधरी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
+ There are no comments
Add yours