अवैध मुरुम व वाळु वाहतूक जोमात – महसूल विभाग कोमात
जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने वाळू वाहतूक आणि गौण खनिजाचे उत्खनन सर्रासपणे सुरू आहे. प्रशासन इतकं निगरगठ्ठ आहे की नागरिकांच्या तक्रारी मिळाल्यानंतरही प्रशासन संबंधितांवर कारवाई करण्यास जाणून बुजून टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. नेरी येथे सुरू असलेल्या अवैध उत्खनन संदर्भात माहिती देऊनही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या आशीर्वादानेच अवैध प्रकार सुरू तर नाही ना असं बोललं जात आहे.
आज नेरी ते जामनेर रस्त्यावरती रसवंतीच्या समोर जो नवीन रस्ता बनवला आहे, त्या ठिकाणी सात ते आठ ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या साह्याने दिवसा सर्रासपणे उत्खनन सुरू होते. याबाबत ची तक्रार नेरी च्या एका व्यक्तीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली. त्यांनी तात्काळ तलाठी आणि पथक कारवाईसाठी पाठवीत असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झाली नाही. या उलट उत्खनन करणारे सावध झाले आणि तेथून काम बंद करून पळ काढला. नेरी चे तलाठी कारवाईसाठी वेळेवर का उपस्थित झाले नाही, उत्खनन करणाऱ्यांना कारवाईची माहिती लगेचकशी मिळाली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तालुक्यात सर्रासपणे दिवसा अवैध वाळू वाहतूक, मुरूम चोरीचे प्रकार सुरू असून देखील प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. अनेकदा या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रार करणे आणि मग शासनाच्या यंत्रणेने कारवाईसाठी जाणे या संपूर्ण टप्प्यात मोठा कालावधी लागतो. या कालावधीत बेकायदा घटना घडून जातातआणि नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचबरोबर बेकायदा गौण खनिज उत्खनन होते. या सगळ्यांना जितके जवाबदार चोरी करणारे आहेत तितकेच जवाबदार प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देखील याबाबद्दल अनेकदा सांगितले गेले आहे,मात्र तरीही तालुक्यात सर्रासपणे प्रशासनाच्या आशीर्वादानेच अवैध उत्खनन करण्याची मुभा मिळत असल्याचे चित्र आहे.
शहरातील काही माफीयाकडुन राञंदिवस अवैध पध्दतीने गौण खनिजाचे उत्खनन सुरू असताना महसूल मात्र मुग गिळून गप्प बसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तर दुसरी कडे अधिकारी आपले खिसे गरम करून घेत असल्याची जोरदार चर्चा जोर धरत आहे.
Slots are so engaging – the anticipation is half the fun! I was checking out platforms like 77ph link & their easy registration process sounds great for beginners. A secure, fun experience is key, right? 👍