जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक परिसरात 28 मार्च 2026 रोजी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. गावठाण दोन शिवारात एका अज्ञात व्यक्तीने झाडाला फाशी घेतल्याचे समोर आले. ही घटना संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मध्यरात्री उलगडला धक्कादायक प्रकार
संध्याकाळी अचानक बातमी पसरली की जंगलात कोणीतरी फाशी घेतली आहे. केकत निंभोरा आणि चिंचखेडा बुद्रुक गावठाण 1 व 2 मधील नागरिक रात्री गाड्यांच्या हेडलाईटच्या उजेडात शोधमोहीम राबवली. दीर्घ शोधानंतर मध्यरात्री एका झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था इतकी कुजलेली होती की ओळख पटवणे कठीण झाले.
आत्महत्येचा कालावधी?
प्राथमिक अंदाजानुसार, मृत व्यक्तीने चार ते पाच दिवसांपूर्वी फाशी घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
पोलीस तपास सुरू
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटवण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. हरवलेल्या व्यक्तींची माहितीही तपासली जात आहे.
अद्याप संशय कायम
हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, हे अद्याप स्पष्ट नाही. जर आत्महत्या असेल, तर कारण काय आहे, याबाबतही माहिती मिळालेली नाही. मृत व्यक्ती कोण व कुठल्या गावचा आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
अज्ञात मृतदेह, कुजलेली अवस्था आणि जंगलातील घटना यामुळे नागरिकांमध्ये “हा व्यक्ती कोण? इथे कसा आला?” असे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. परिसरात चिंता आणि संशयाचे वातावरण पसरले आहे.
+ There are no comments
Add yours