जळगाव युवक शहराध्यक्षपदी विनायक पाटील यांची नियुक्ती

जळगाव — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) युवक आघाडीच्या जळगाव शहराध्यक्षपदी विनायक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनायक पाटील प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच, पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या विचारांना पुढे नेऊन युवक संघटन वाढवण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours