जामनेरमध्ये राजकीय भूकंप; विश्वजित पाटीलांचा शिवसेनेत प्रवेश, मविआला धक्का


जामनेर तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित मनोहर पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून, यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

विश्वजित पाटील यांच्यासोबत त्यांचे वडील व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या वेळी मंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत काते, जिल्हाप्रमुख समाधान महाजन आदींची उपस्थिती होती.

जामनेर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना, या भागात शिवसेनेने “ऑपरेशन टायगर” राबवत विश्वजित पाटील यांना आपल्या गोटात घेतल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, पाटील यांच्यासोबत महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख चेहरेही शिवसेनेत दाखल झाल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पक्षप्रवेशामुळे शिवसेना तालुक्यात अधिक बळकट होणार असून, संघटनात्मक ताकद वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे. परिणामी, आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours