जामनेर शहरातील बोदवड रोडवरील ऋषिकेश नर्सरी जवळ दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती रावेर तालुक्यातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून, अपघात नेमका कसा झाला आणि मृत व्यक्तीची ओळख काय आहे याचा पुढील तपास सुरू आहे.
+ There are no comments
Add yours