जामनेर: सोनबर्डी टेकडीवर नगरपरिषदेच्या वतीने राबवली स्वच्छता मोहीम 

जामनेर मधील सोनबर्डी टेकडी येथे जामनेर नगरपरिषदेमार्फत मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन, मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून व साधनाताई महाजन, माजी नगराध्यक्षा यांचे मार्गदर्शनातून प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत विविध कामे पूर्ण झालेली आहेत, तसेच इतर बरीच कामे सुरु आहेत. सदर ठिकाणचे सोनेश्वर महादेव मंदीर, जॉगींग ट्रॅक, सायकल ट्रॅक, नानानानी पार्क, लेझरशो, आर्टीफिशियल बिच, चौपाटी हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र झालेले असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे आज नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सदर ठिकाणी आज जामनेर नगरपरिषदेमार्फत श्री नितीन बागुल, मुख्याधिकारी नगरपरिषद जामनेर यांचे मार्गदर्शना खाली महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानातंर्गत सोनबर्डी टेकडी येथे डिपक्लीन मोहीम राबविण्यात आली. सदरचे मोहीमेतंर्गत ४ ते ५ टन कचरा जमा करण्यात आला. त्यामध्ये प्लॉस्टीक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थचे रिकामे पाकीट इत्यादी जमा करण्यात आले.

जामनेर नगरपरिषदेमार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदरचा परिसर हा स्वच्छ ठेवावा, आपण उघड्यावर कचरा फेकु नये, सदर ठिकाणी असलेल्या कचरा कुंडीतच कचरा टाकावा जेणे करून सदरचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेण्यास मदत होईल.

सदरची मोहीम यशस्वी करणेसाठी श्री. रविकांत डांगे, उपमुख्याधिकारी, श्री. प्रदिप धनके, नगर अभियंता, श्री. अमर राऊत, नगर अभियंता, श्री. आर.डी. सुर्यवंशी, पा.पु. अभियंता, श्री. दत्तात्रय जाधव, लेखापाल, श्री. गौरव कडू, अंतर्गत लेखापरीक्षक, श्री. आनंद कळमकर, नगर रचना सहाय्यक, श्रीमती सलोनी वाघ, बांधकाम अभियंता, श्रीमती पल्लवी शेळके, करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी, श्री. देविदास अहिरे, कर अधिक्षक, श्री. विशाल दिक्षीत, करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी, श्री. विजय सपकाळे, स्वच्छता निरीक्षक, श्री. दादोजी बाविस्कर, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, श्री. श्रीकांत भोसले, आस्थापना लिपीक, श्री. भरत मराठे, श्री. आत्माराम शियदे, लिपीक, श्री. अरुण जाधव, लिपीक, श्री. शेख बिलाल, लिपीक, श्री. गजानन गाडगे, लिपीक, श्री. गोकुळ मराठे, श्री. संदिप काळे तथा सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours