HMPV या व्हायरसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) बाबत सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये या विषाणूचा कहर पाहायला मिळत होता, मात्र आता या विषाणूने भारतात आपली वर्णी लावली आहे आणि केवळ भारतातच नाही तर महाराष्ट्रातील नागपुरातीही आता HMPV चे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आले आहेत.

HMPV या व्हायरसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्णालय तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

जळगाव महाविद्यालयामध्ये 20 बेड जास्तीचे कक्ष,14 बेड, पी आय सी यु व 36 बेड एन आय सी यु असे एकूण 70 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. 

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध असून स्वतंत्र 20 बेड असलेला कक्ष जास्तीचे तयार ठेवण्यात आले आहेत. 14 बेड पीआयसीयु तसेच 36 बेड एनआयसीयु अशा पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची तयारी करण्यात आली आहे. डॉ.गिरीश ठाकूर, अधिष्ठाता,

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय 3, ग्रामीण रुग्णालय 20 आणि प्राथमिक आरोग्य केंद्र 77 असून त्यांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक.

या विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभरात तयारी सुरू असून लोक कोरोना विषाणूप्रमाणे उपचार करत आहेत. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस आणि कोरोना व्हायरसची काही लक्षणेही सारखीच आहेत, ज्यामुळे हा एकाच प्रकारचा धोकादायक विषाणू मानला जात आहे. 

काय करावं?

* खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. 

* साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.

* ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

* भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.

* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करणं टाळावं?

* खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. 

* टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं. 

* आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं. 

* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours