भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्त आज जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे यांनी कुटुंबासह बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.तसेच, जमलेल्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर प्रेमी उपस्थित होते. यादरम्यान गावकऱ्यांच्या वतीने वाट सरूंना शीत पेय वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
राज्यसह देशात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी होत आहे. केकत निंभोरा येथे देखील भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला समस्त गावकरी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतांना दिलीप खोडपे सर म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापूर्ते मर्यादित नसून, ते सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांतून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.
*या पवित्र दिवशी गावातील भीमसैनिकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. कडाक्याच्या उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना शीतपेय वाटप करून बाबासाहेबांच्या “सर्वांसाठी समानता व सेवा” या विचारांना कृतीतून आदरांजली वाहण्यात आली.
+ There are no comments
Add yours