जामनेर :सीसीटीव्ही नसल्याने बस स्थानक बनले चोरट्यांचे “आगार”

बस स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी 

चोरीचे गुन्हे उघडतीस आणण्यात पोलीस प्रशासन असक्षम?

जामनेर बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यासह बॅगा व खिशातून मोबाईल, पैसे लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे जामनेर बस स्थानक एस टी बसेस साठी नाही तर  चोरट्यांचे आगार बनले आहे. महामंडळाचे सुरक्षा रक्षक असो की पोलीस नावालाच असून या दोन्ही यंत्रणा पुरेशी खबरदारी घेत नसल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे.

काल गुरुवार रोजी हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत होत्या.  त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना  दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.

मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी देखील बसस्थानकातून अनेक महिलांच्या सोनसाखळ्यासह रोख रक्कम चोरी झालेल्या आहेत. मोबाईल चोरीच्याही घटना देखील घडलेल्या आहेत. एक तर तक्रार घ्यायलाच पोलिसांकडून आढेवेढे घेतले जातात, घेतलीच तर मोबाईल किंवा चोरटा सापडेल याची शाश्वती नाही, त्यामुळे बरेच तक्रारदार तक्रार देणेही टाळत असल्याचे अनुभव आहेत.  दुसरीकडे आतापर्यंत बस स्थानकात चोरी झालेल्या घटने पैकी हे काही घटना उघड झालेली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस प्रशासन देखील असक्षम असल्याचं दिसून येत आहे .गुन्हे उघड होत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

व्यवस्थापकांकडून बस स्थानकाची पाहणी

काल गुरुवार 15 मे रोजी जामनेर बस स्थानकाची पाहणी व्यवस्थापन कडून केली गेली. त्यावेळी व्यवस्थापनांकडून जामनेरच्या वाहन चालक आणि इतर कर्मचाऱ्या ंचे मोठे योगदान असल्याचं व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. जामनेर बस स्थानकाचे कामगिरी देखील चांगली आहे असे असताना देखील जामनेर बस स्थानकावर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष का होत आहे असा मोठा प्रश्न प्रवासी विचारत आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours