जामनेर येथील गी.द.म. कला, के.रा.न. वाणिज्य व म.धा. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा दिनेश चव्हाण हिने श्री जे.जे.टी. विश्वविद्यालय, झुंझुनू, राजस्थान येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धा (२०२४-२०२५) मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक प्राप्त केले आहे. जामनेर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून, अखिल भारतीय स्तरावरील आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची प्राप्ती करणारी हर्षदा ही पहिली खेळाडू ठरली आहे. त्यामुळेच तिचे हे यश ऐतिहासिक पथदर्शक मानले जात आहे.
अखिल भारतीय स्तरावरील या स्पर्धेत जामनेर महाविद्यालयातील एकूण ४ खेळाडूंची निवड करण्यात आली होती:- सोहम राजेश पवार, शंकर मंगलसिंग राजपूत, हर्षदा दिनेश चव्हाण आणि कोमल राजू भोई. या खेळाडूंनी प्रथम कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आंतर विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राजस्थानमधील या अखिल भारतीय स्पर्धेसाठी प्रवेश प्राप्त केला होता. या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.नवनीत आसी यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले होते.
सुवर्णपदक विजेती कु. हर्षदा चव्हाण आणि तिच्या सोबत राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र बाबुराव पाटील सचिव माननीय श्री जितेंद्र रमेश पाटील व सर्व संचालक मंडळाने यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र खडायते , उप प्राचार्य प्रा.डी.एस. पाटील , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.अरविंद राऊत , क्रीडा संचालक प्रा.डॉ.नवनीत आसी, डॉ. किरण पाटील, प्रा. देवा पाटील तसेच महाविद्यालयाच्या इतर सर्व घटकांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
+ There are no comments
Add yours