अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रफुल्ल लोढा यांना अटक 9 जुलै पर्यंत कोठडी 

जामनेर नगरीतील एका व्यावसायिकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रफुल्ल लोढा (वय 62 पहूर, जामनेर) यांना 9 जुलै पर्यंतसुनावण्यात आली आहे. 

नेमक प्रकरण काय?

आरोपी प्रफुल्ल लोढा (६२) याचा  मुंबई, पहूर आणि जामनेर येथे व्यवसाय आहे. त्याच्याकडे काही काळापूर्वी एक १६ वर्षीय पीडित मुलगी नोकरी मागण्यासाठी गेले होती. मात्र चकाला येथील लोढा हाऊस येथे ४ जुलै रोजी आरोपीने मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या १६ वर्षीय मैत्रिणीवरही त्याने अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. नोकरी न देता दोन्ही मुलींची अश्लील छायाचित्रे चित्रित करून ते व्हायरल करण्याची धमकी पीडितांना दिली होती. याबाबत दोन्ही मुली जाब विचारण्यासाठी गेल्या असता आरोपी लोढाने दोन्ही मुलीना माराहण केली. तसेच पीडित मुलीच्या मैत्रिणीला लोढा हाऊसमध्ये डांबून ठेवले होते.

अखेर याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५२ (२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम ४, ८ अनव्ये गुन्हा दाखल केला. साकिनाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपी लोढाला अटक केली.

६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा यांना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. प्रफुल्ल लोढा यांना 9 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रफुल्ल लोढा यांच्या घर आणि व्यवसायाची झडती!

प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी जामनेर,पहूर आणि मुंबई येथील संकुलाची झडती पोलिसांकडून घेतली गेली. प्रफुल्ल लोढा हे राजकारणात देखील सक्रिय आहेत. पूर्वी भाजपचे गिरीश महाजन आणि भाजप विरोधी होते, मात्र 2024 मध्ये च्या निवडणुकीवेळी त्यांनी भाजप प्रवेश केला होता.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours