जामनेर (दि. 18 सप्टेंबर): तालुक्यातील मुंदखेडा गावात घरगुती वादाने भीषण रूप धारण करत एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील बाळु विश्वनाथ भिल या व्यक्तीने धारदार चाकूने वार करून स्वतःच्या पत्नी अनिता उर्फ मिनाबाई भिल (आधार कार्डावरील नाव – अनिता मोरे) हिची निर्घृण हत्या केली.
गंभीर जखमी अवस्थेत तिला तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि जलद गतीने तपास सुरू केला. अवघ्या काही तासांतच आरोपी बाळु भिल याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घरगुती वादाचे किती भीषण परिणाम होऊ शकतात याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
+ There are no comments
Add yours