जामनेर महाविद्यालयात युवती सभेच्या वतीने पारंपरिक दिनाचा जल्लोष

जामनेर : जी.डी.एम. आर्ट्स, के.आर.एन. कॉमर्स अँड एम.डी. सायन्स वरिष्ठ महाविद्यालयात युवती सभेच्या वतीने पारंपरिक दिन (Traditional Day) व साडी डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनींसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने उस्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा प्रमुख डॉ. उज्वला गावित यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र खडायते होते. त्यांनी गांधी टोपी घालून स्वतः पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कला शाखेचे विभागप्रमुख प्रा. विजेंद्र पाटील यांनी पारंपरिक दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तर उपप्राचार्य प्रा. डी.एस. पाटील आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ. अमर पवार यांनी शुभेच्छा देऊन उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मनीषा चौधरी यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. वर्षा मानवटकर, डॉ. कोमल चूघ, प्रा. प्रणिता सुतार, डॉ. सीमा सरताळे व प्रा. नीलिमा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परिसरात सांस्कृतिक वातावरण रंगवून ठेवले होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours