शेंदुर्णी : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेंदुर्णी येथे भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून आले. बैठकीस प्रमुख उपस्थिती लाभली होती.
बैठकीदरम्यान आगामी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्व जागांवर विजय मिळवेल, या निर्धाराने कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले. इच्छुक उमेदवारांनी पक्षामार्फत उमेदवारी अर्ज दाखल करावेत तसेच त्यांच्या मुलाखती लवकरच घेण्यात येतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच निवडणूक काळात प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले की, मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी शहरात विकासाची गंगा वाहत आहे. शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, पायाभूत कामे आणि नागरी सुविधांमध्ये झालेली प्रगती लक्षात घेता आगामी निवडणूक भाजपसाठी अधिक सुकर ठरणार आहे. मात्र विजय आपोआप मिळत नाही — त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी केले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी नाना सोनार यांची शेंदुर्णी निवडणूक प्रभारी म्हणून निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीस भाजपचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण सभागृहात निवडणूक तयारीचा उत्साह आणि विजयाच्या निर्धाराची झलक दिसून येत होती.
+ There are no comments
Add yours