प्रतिनिधी
जामनेर
संस्कृत साहित्यातील पहिले कवी आणि आदिकवि म्हणून ओळखले जाणारे महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज, मंगळवार दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जामनेर येथील आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय परिवारातर्फे करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. अनिल बारी (समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना) आणि डॉ. नरेंद्र जोशी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. खडायते, उपप्राचार्य प्रा. डी. एस. पाटील, माजी प्राचार्य डॉ. ए. आर. पाटील, तसेच इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भीमराव शिरसाठ यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी यांच्या आदर्श जीवनावर आणि रामायण या त्यांच्या अमर काव्यग्रंथावर उपस्थित प्राध्यापकांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, आदर्श व साहित्यप्रेमाची भावना दृढ झाली.
+ There are no comments
Add yours