सिद्धगड भवानी मंदिर येथे स्वच्छता शिबिर उत्साहात पार – मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे मार्गदर्शन

जामनेर प्रतिनिधी

जामनेर :
जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित गी. द. महाजन कला, के. रा. नवलखा वाणिज्य आणि मनोहरशेठ धारिवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि विद्यार्थी विकास योजना एककाच्या संयुक्त विद्यमाने सिद्धगड भवानी मंदिर परिसरात एक दिवसीय स्वच्छता शिबिर उत्साहात पार पडले.

या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी भेट देवून स्वयंसेवकांशी संवाद साधला व त्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.

मीएन्ट्री गिरीश महाजन म्हणाले की,

“प्रत्येकाने आपल्या गावात स्वच्छता मोहीम राबवावी, गाव हागणदारीमुक्त व रोगमुक्त करावे. तसेच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे ‘आईप्रमाणे संगोपन’ करावे.”

या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास योजनेचे एकूण १३५ स्वयंसेवक आणि ८ प्राध्यापक सहभागी झाले. स्वयंसेवकांनी भवानी मंदिर परिसरातील कचरा गोळा करून योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली. तसेच परिसरातील विखुरलेली खडी एकत्र करून स्वच्छतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

यानंतर वनविभागाच्या उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. जितेंद्र बाबुराव पाटील, सचिव मा. जितेंद्र रमेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. खडायते, उपप्राचार्य प्रा. डी. एस. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. वाघ, तसेच प्रा. डॉ. विजयेंद्र पाटील, प्रा. डॉ. अक्षय घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. मनिषा चौधरी आणि प्रा. डॉ. रणधीर जाधव यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अक्षय घोरपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रविंद्र वाघ यांनी मानले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. मनिषा चौधरी, प्रा. डॉ. रणधीर जाधव, प्रा. जितेंद्र पवार, प्रा. डॉ. विशाल गवळी, प्रा. प्रितिक जैन, प्रा. डॉ. सीमा सरताळे, प्रा. नीलिमा चौधरी, प्रा. प्रणिता सुतार, श्री. दीपक पाटील आणि रामेश्वर पारधी यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराच्या समारोपावेळी सायंकाळी ५ वाजता सर्व स्वयंसेवकांनी “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेची शपथ घेतली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात श्री. मयूर काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours