ठाण्याचे सीईओ रोहन घुगे झाले जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर 

रोहन घुगे तरुणाईसाठी प्रेरणादायी प्रशासक!

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. आयुष प्रसाद यांची बदली नाशिक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली असून, ते नाशिककडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

 महाराष्ट्रातील तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये नावारूपाला आलेले रोहन बापूराव घुगे (IAS) हे सध्या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. २०१८ बॅचचे हे तरुण अधिकारी त्यांच्या दूरदर्शी विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जातात.

रोहन घुगे यांनी आपल्या प्रशासनात नशामुक्ती, शिक्षण सुधारणा आणि सामाजिक चळवळी यांसारख्या विषयांवर सक्रियपणे काम करत जिल्हा प्रशासनाला एक नवा चेहरा दिला आहे. “समाजात बदल घडवायचा असेल तर तो फक्त शासनाच्या यंत्रणेवर अवलंबून न राहता, जनतेच्या सहभागातूनच शक्य आहे,” असे ते नेहमी सांगतात.

अलीकडेच ठाणे जिल्हा परिषदेच्या “१०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात” त्यांनी केलेल्या नव्या उपक्रमांमुळे ठाणे जिल्ह्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला. प्रशासनातील पारदर्शकता आणि जनसंपर्कातील त्यांच्या सुलभ वृत्तीमुळे अधिकारी व नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे.

रोहन घुगे हे UPSC २०१७ मध्ये यशस्वी झाले असून, IAS सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वात राबवलेले प्रकल्प हे केवळ आकड्यांपुरते मर्यादित न राहता, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणारे ठरले आहेत.

अलीकडेच त्यांच्या जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली होण्याची शक्यता असल्याची चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्याचा कारभार स्वीकारल्यास तिथेही त्यांच्या कार्यशैलीचा नवा ठसा उमटेल, असा विश्वास जनतेत व्यक्त केला जात आहे.

“प्रशासन म्हणजे फक्त कागदोपत्री निर्णय नव्हे, तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचं माध्यम आहे,” असा विचार मांडणारे IAS रोहन घुगे हे तरुण अधिकाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours