जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक : प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना लेखी सादर करण्याचे आवाहन

, दि. ६- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येऊन ती ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात निरीक्षणासाठी व पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती विहित वेळेत दाखल कराव्यात. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.


Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours