‘ओशन इंटरनॅशनल स्कूल’मध्ये पर्यावरणपूरक दिवाळी व आईसोबत डब्बा पार्टीचा उत्साह

जामनेर  – दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ‘ओशन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर (ICSE Pattern)’ येथे गुरुवारी पर्यावरणपूरक दिवाळी आणि ‘आईसोबत डब्बा पार्टी’ हा आगळावेगळा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळेच्या चेअरपर्सन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून, दिवे लावून आणि फटाक्याविना दिवाळी साजरी करत पर्यावरणपूरकतेचा संदेश दिला. यावेळी फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

शिक्षकवृंदांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त चॉकलेट्स देण्यात आले, तर ‘आईसोबत डब्बा पार्टी’ दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला. विविध घरगुती पदार्थांनी रंगलेली ही डब्बा पार्टी प्रेम, स्नेह आणि एकतेचा सुंदर संदेश देऊन अविस्मरणीय ठरली.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours