पिंपळगाव गोलाईजवळ भीषण अपघात – चार तरुणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

जामनेर दि. 26
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुखद घटना 25 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता घडली.

प्राथमिक माहितीनुसार, जामनेर येथील पाच तरुण एकाच मोटारसायकलवरून जामनेरवरून पहूरकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या बुलेरो पिकअप आणि मोटारसायकलची जबर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचे तुकडे तुकडे झाले तर बुलेरो पिकअपही उलटून पडली. यात मोटारसायकलवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी असून त्याला तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांत अंकुश लोखंडे (24), अतुल सुरवाडे (22), दोघे रा. भीमनगर जामनेर, तसेच रवि लोंढे (20) आणि अजय साबळे (25) यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच भीमनगर परिसरातील शेकडो तरुणांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात मृतदेह पाहताच नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांचा आक्रोश उसळला. एकाच वेळी चार तरुणांचा मृत्यू झाल्याने जामनेर शहरात शोककळा पसरली असून वातावरण हळहळून गेले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours