महत्वाकांक्षा व जिद्दीने मेंढपाळाची लेक झाली पो. उपनिरीक्षक

गावच्या लेकीने जिद्दीने करून दाखवलं ; लता झाली पोलीस उपनिरीक्षक !

जिद्द चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा असेल तर हवं ते मिळवता येतं आणि असंच करून दाखवलं आहे ते एका शेतकऱ्याच्या मुलीने. सर्वात कठीण परीक्षा म्हणजे  एम. पी. एस. सी. समजली जाते.पण जिद्द व चिकाटी  असेल आणि  मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलीच परीक्षा कठीण नसते. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एका  सामान्य मेंढपाळ शेतकऱ्याच्या लेकीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. जळगाव सपकाळ गावातील शेतमजुराच्या लेकीनं परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

लता सुरेश सावळे असं या पोलीस उपनिरीक्षक झालेल्या तरुणीचं नाव आहे.

जालना जिल्ह्य़ातील भोकरदन तालुक्यात असलेल्या जळगाव सपकाळ गावात लता सपकाळ ही आपल्या आई वडिलांसोबत राहत आहे. घरची हालाकीची परीस्थिती असल्याने लता सुरेश सावळे हिने प्रचंड मेहनत घेऊन एम. पी. एस. सी. ची परीक्षा दिली. लहानपणापासून लता यांना पोलीस व्हायचे होते त्यामुळे तिने त्यासाठी कठोर मेहनत देखील घेतली. तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले.कठोर परिश्रम घेतल्याने लता यांनी एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण केली . परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एका साधारण कुटुंबातील लता आता पोलीस उपनिरीक्षक झाली असून कुटुंबासह गावाचं नाव तिने मोठा केले आहे . त्यामूळे जळगाव सपकाळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लताच्या माध्यमातून रोवला आहे.

लता सुरेश सावळे हिने नाशिक येथून पी. एस. आय चे प्रशिक्षण पूर्ण करून गावाला भेट दिली असता त्यानिमित्त गाव गावकऱ्यांच्या व समाजाच्या वतीने तिचा नागरि सत्कार करण्यात आला. लता सुरेश सावळे तिचे वडील शेती करून जोडधंदा म्हणून मेंढी पालन करतात. लता यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. मात्र लता यांनी परिस्थितीला सामोरे जात शिक्षण आणि कठोर मेहनत घेतली आणि पोलीस उपनिरीक्षक झाली 

  लता यांच्या वडिलांनी देखील आपली मुलगी आणि मुलगा शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांनी तिला शिक्षण देण्याचे काम केले. लता हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जळगाव येथे झाले. त्यानंतर ८ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण तिने विनय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेतले. आपल्याला काहीतरी करून दाखवायचं त्या उद्देशाने तिने पुढील पदवीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन २०२३ चे मुख्य परीक्षेत तिला यश मिळाले. तिने नाशिक येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि तिची पहिली पोस्टिंग मुंबई शहरात झाली. त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने आणि समाजाच्या वतीने तिचा नागरिक सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक लता सुरेश सावळे हि जामनेर पुरा येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते रवि वाघ यांची नातेवाईक असुन त्यांनी सुद्धा पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

एका लहानशा गावातील मुुलीने, जिद्द व चिकाटीने आज ती युवती पोलीस उपनिरीक्षक झाली आहे.जळगाव सपकाळ येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours