विहिरीच्या ब्लास्टिंग दरम्यान घडली दुर्घटना: एकाचा मृत्यू दोन जखमी

जामनेर 

जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथे विहीर खोदकाम सुरू असताना ब्लास्टिंग करताना मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यु झाला असून इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. राहूल धनराज वाघ (वय 35,राहणार मुंदखेडा जामनेर)

अस मयत व्यक्तीचे नाव आहे.तर इतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज बुधवार रोजी सकाळी राहुल धनराज वाघ इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत येथे विहीर खोदण्यासाठी गेले होते. मात्रा अचान क ब्लास्टिंग झाल्याने विहिरीत अडकलेले राहुल वाघ आणि इतर सहकारी यांच्यावर भले मोठे दगड येऊन पडले. यामध्ये राहुल वाघ आणि इतर दोन सहकारी मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच तिघांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले . मात्र उपचारापूर्वीच राहुल धनराज वाघ यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले आहे. त्याचबरोबर इतर दोन सहकाऱ्यांना लागलीच जळगावच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं स्थानिकांचे म्हणणं आहे. 

घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील रूग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर मयत आणि जखमींच्या नातेवाईकांशी चर्चा करून सांत्वन करण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांना योग्य कारवाईच्या सूचना गिरीश महाजन यांनी दिल्या आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours