मोहन दुबे संपादक जामनेर :
जामनेर विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीचे उमेदवार गिरीश महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांचा झंजावती दौरा सुरू आहे. गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे हे गावागावात जाऊन आपला प्रचार करत आहेत. एकीकडे गिरीश महाजन हे गेल्या 30 ते 35 वर्षात केलेल्या विकासाची यादी मतदारांपुढे वाचत आहेत तर दुसरीकडे मात्र बेरोजगारी,शेतीमालाला भाव, टेक्सटाईल कंपन्यांचा अभाव असे मुद्दे विरोधात उचलून धरत आहेत
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जामनेर विधानसभा मतदार संघ हा गेल्या 35 वर्षापासून ग्रामविकास मंत्री भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला आहे. 1995 पूर्वी हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.जामनेर विधानसभा मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधी महाविकास आघाडीच्या वतीने गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या ३० वर्षापासून खंदे समर्थक असलेले दिलीप खोडपे हे गिरीश महाजनांच्या विरुद्ध जामनेर मतदार संघात निवडणूक लढवीत आहेत.
सर्वसामान्यांचा मराठा उमेदवार म्हणून जामनेर मतदार संघात दिलीप खोडपे यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. दुसरीकडे निवडणूक प्रचारात रंगत आल्याने मतदार संघात लक्ष न घालणारे गिरीश महाजन देखील लक्ष घालून गावागावात आपला प्रचार करत आहेत. गिरीश महाजन आणि दिलीप खडपे दोन्ही मातब्बर नेते असून गावागावात प्रचार करून आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
विरोधकांना भाजपमध्ये घेण्याची खेळी
– गिरीश महाजन यांनी यावेळी वेगळी खेळी खेळली. त्यांनी आपल्याकडे विरोधकांना भाजपमध्ये घेत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.
– गेल्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले संजय गरूड हे आता राष्ट्रवादीऐवजी भाजपमध्ये आहेत. असे असताना ज्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले त्या दिलीप खोडपे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला आणि महाजनांविरोधात उमेदवारीही मिळवली आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. RSS आणि भाजपच्या मुशीत वाढलेले दिलीप खोडपे सर यांनी गिरीश महाजन यांच्या समोर तगड आव्हान उभं केल आहॆ.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
– विविध खात्याचे मंत्री म्हणून महाजन यांनी मतदारसंघात भरीव निधी आणला.
– शेतीमालाला भाव, औद्योगिक विकास या मुद्यांचा विरोधकांकडून वापर केला जात आहे. तर
– याउलट ३० वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर सत्ताधारी प्रचार करीत आहे.
– जामनेर मतदार संघात असंख्य तरुण बेरोजगार
– जामनेर एमआयडीसी मध्ये कोणत्याही मोठ्या कंपन्या आल्या नाहीत
– जामनेर मध्ये होणारी टेक्स्टाईल पार्क दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाल्याचा आरोप
– शेतीमालाला भाव नाही
– जामनेर मतदार संघातील सुरू असलेल्या सहा कंपन्या बंद पडल्या
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात ३६ हजार मतांची आघाडी मिळाली होती.
*गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे टफ फाईट*
जामनेर विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपेंच तगड आव्हान आहे. दिलीप खोडपे हे गेल्या 35 वर्षापासून गिरीश महाजन यांच्या सोबतच भाजपमध्ये काम करत होते मात्र या वेळेस त्यांनी बंडखोरी करत शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. गिरीश महाजन यांच्याकडून अनेक कार्यकर्त्यांची काम होत नसल्याची टीका दिलीप खोडपे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून केली आहे. तर गिरीश महाजन यांनी या टीकेला उत्तर देत दिलीप खोडपेना जिंकून येण्याचं आवाहन देखील दिले आहे.
+ There are no comments
Add yours