राष्ट्रीय मतदार दिनी प्रा. डॉ. रविंद्र वाघ यांचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते गौरव

निवडणूक विषयक उत्कृष्ट कार्यासाठी प्रा. डॉ. रविंद्र वाघ यांना जिल्हास्तरीय इ.एल.सी. क्लब पुरस्कार

जामनेर | प्रतिनिधी
जामनेर येथील गी. द. महाजन कला, श्री. के. रा. नवलखा वाणिज्य व मनोहरशेठ धारिवाल विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक तथा क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या व्यवसाय प्रशासन अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. रविंद्र वाघ यांना जिल्हास्तरीय निवडणूक विषयक उत्कृष्ट कार्याबद्दल इ. एल. सी. क्लब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. श्री. रोहनजी घुगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीमंत हरकळ, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. अशोक नखाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मा. श्रीमती अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी मा. श्री. विनय गोसावी, तहसीलदार मा. शीतल राजपूत, तहसीलदार मा. नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार मा. श्री. सुभाष कुंभार, सहाय्यक निवडणूक अधिकारी मा. श्री. सुनील राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल मंत्री तथा कुंभमेळा मंत्री मा. नामदार गिरीषभाऊ महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्र बाबुराव पाटील, सचिव मा. श्री. जितेंद्र रमेश पाटील, सहसचिव मा. श्री. शिवाजी सोनार, ज्येष्ठ संचालक मा. श्री. दिलीपभाऊ महाजन, प्राचार्य डॉ. आर. एस. खडायते, उपप्राचार्य प्रा. डी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक व मित्रपरिवाराने अभिनंदन केले.
पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. रविंद्र वाघ यांनी सांगितले की, “या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदारीत वाढ झाली असून, राष्ट्रकर्तव्याच्या भावनेने अधिक जोमाने व तत्परतेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours