प्रमाणपत्र मिळाल्याने कर्ज मिळणे सुलभ होणार – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

नाशिक –प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते “सनद वितरण” कार्यक्रमात स्वामित्व योजनेअंतर्गत आज देशातील ५०००० पेक्षा जास्त गावांमध्ये ६५ लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात नाशिक येथून ऑनलाइन माध्यमातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला.
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण होऊन सर्व मिळकतीचे “स्वामित्व” म्हणजेच मालकी हक्क निश्चित केला जात आहे. सर्व सार्वजनिक मिळकती व खाजगी मिळकतींना प्रमाणित केल्यामुळे सार्वजनिक मिळकतींवर होणारे अतिक्रमण रोखणे शक्य होणार आहे. तसेच, खाजगी मिळकतींचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्या मिळकतींवर नागरिकांना कर्ज मिळणे सुलभ होणार आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours