कामे जलदगतीने पूर्ण करा , निधी कमतरता पडू देणार नाही – गिरीश महाजन

मुंबई –नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती कामे विशेष दुरुस्ती योजनेतून करावीत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांचे कॅनॉल दुरुस्ती व गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित कामासंदर्भात जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस माजी आमदार शोभाताई फडणवीस, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजय टाटू, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, अधीक्षक अभियंता राजेश पाटील व प्रवीण झाडे आदी उपस्थित होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours