जामनेरच्या तरुणाने मित्रासह घातला अनेकांना लाखोंचा गंडा!

नोकरीच आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्र देत फसवणूक

पहूर येथील शेतकऱ्याच्या फसवणुकीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या तरुणालाही १६ लाखांत चुना

जळगाव 

 नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत पैसे उकळून जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर येथील शेतकऱ्याची लाखोंची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर तालुक्यातील पहूर येथील शेतकरी नंतर आता छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाची देखील संरक्षण खात्याचे बनावट नियुक्ति पत्र देऊन १६ लाखांत फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याबाबत जितेंद्र भागवत थाटे (वय ३५, रा. विवेकानंद नगर, जळगाव) आणि तुषार दीपक गावंडे (३०, रा. गिरीजा कॉलनी, जामनेर) यांच्याविरुद्ध पहूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यातील तुषार हा पोलिस कोठडीत आहे.

नियुक्तिपत्र बनावट निघाल्याने पैशांची मागणी

संशयितांनी पहूर येथील शेतकरी गजानन पाटील यांची दहा लाखांत फसवणूक झाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी कमलाकर उत्तमराव गायके यांचा मुलगा अशिष याला शासकीय रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी म्हणून लावण्यासाठी संशयितांनी दहा लाख रुपये घेतले होते. जितेंद्र थाटे याने संरक्षण खात्यात नियुक्ती पत्र देतो असे गायकेंना सांगितले. पण, त्यासाठी आणखी सहा लाख रुपये लागतील म्हणत पैसे उकळले आणि सहा महिन्यांनंतर केंद्रीय संरक्षण खात्याचे नाव असलेले ११ एप्रिल २०२३ तारीख असलेले पुण्यातील सैनिकी मुख्य कार्यालयाचे नियुक्तीचे पत्र दिले. पण, है नियुक्तिपत्र बनावट असल्याने पैसे परत देण्यास गायके यांनी सांगितले. त्यावर दोघाही संशयितांनी टप्प्याटप्प्याने दहा लाख रुपये परत केल्याचे कमलाकर गायके यांनी सांगितले.

दीड कोटींपर्यंत फसवणूक

कमलाकर गायके आणि गजानन पाटील यांच्या सोबतच इतरांची देखील फसवणूक झाल्याच म्हटलं जात आहे. फसवणुकीची रक्कम दीड कोटींच्या घरात असल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात येत आहे. या टोळीत मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी व जळगावातील एक संशयित असल्याची चर्चा आहे. या दोघांना पोलिसांनी चौकशी कामी नोटीस बजावली आहे.

कमलाकर गायके व गजानन पाटील यांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांची रविवारी भेट घेऊन संपूर्ण माहिती व बनावट दस्तऐवजाचे कागदपत्रे सादर केली.

फंसवणूक झालेल्या काही तरुणांनी रविवारी जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.

या प्रकरणात मालेगाव व धुळे येथील काही बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. याबाबतही तपास सुरू आहे.

-सचिन सानप, (पोलिस निरीक्षक, पहूर ,ता. जामनेर).

संशयितांपैकी जितेंद्र याने गजानन पाटील यांना फोन करून तक्रार मागे घेण्याबाबत धमकी दिल्याचं देखील बोलल जात आहे.

(सदरील बातमी लोकमत वृत्तपत्रात देखील प्रदर्शित झालेली आहे)

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours