जामनेर नगर परिषदेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नगर परिषदेचे लेखापाल श्री. दत्तात्रय जाधव व अंतर्गत लेखापरीक्षक श्री.गौरव कडू यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री नितीन बागुल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेपुढे सादर केला गेला. 462 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करत यात जामनेरकरांना मोठा दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जामनेर शहराचा सृजनात्मक जडणघडणीतून नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली प्रदान करण्याचा प्रयत्न जामनेर नगरपरिषद सातत्याने करत आली आहे. स्वच्छ सुंदर, हरित व प्लास्टिक मुक्त असे परिपूर्ण जामनेर शहर करण्याचा जामनेर नगर परिषदेचा मानस आहे. त्याच उन्नत दिशेच्या दृष्टीने टाकलेले पाऊल म्हणजे सण 2025 26 चा अर्थसंकल्प जो दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी जामनेर नगर परिषदेचे लेखापाल श्री. दत्तात्रय जाधव व अंतर्गत लेखापरीक्षक श्री.गौरव कडू यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री नितीन बागुल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेपुढे सादर केला व सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत सर्वानुमते अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
अर्थसंकल्पात तरतूद केलेली महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
1. कुठल्याही प्रकारची करवाढ नाही
2. महाराष्ट्र राज्य नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्प (टप्पा क्र.2) 82 कोटी
3. महाराष्ट्र राज्य नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्प (टप्पा क्र.3) 88 कोटी
4. पर्यटन विकास प्रकल्प योजना 15 कोटी
5. वैशिष्ट्य पूर्ण योजना (4217) 70 कोटी
6. वैशिष्ट्य पूर्ण योजना (2217) 30 कोटी
7. विशेष रस्ता अनुदान 20 कोटी
8. नागरी सेवा सुविधा 50 कोटी
9. भुयारी गटार योजना (टप्पा.क्र.2) 15 कोटी
(टप्पा.क्र.3) 12 कोटी 10. वाढीव पाणी पुरवठा योजना (टप्पा.क्र.3) 12
11. अमृत योजना 20 कोटी
जामनेर
जामनेर नगर परिषद द्वारे यावर्षी एकूण 462.15 कोटी चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विविध योजनेद्वारे एकूण 462.15 कोटीचा खर्च अपेक्षित असून एकूण 10.07 लक्ष शिलकीचा अर्थसंकल्प यावर्षी जामनेर नगर परिषद द्वारे सामान्य जनतेसाठी तयार करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियानाद्वारे आपले जामनेर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे आव्हाहन देखील मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी जनतेला केले आहे.
+ There are no comments
Add yours