वीर मरण आलेल्या जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेताना गिरीश महाजन यांना दुखापत

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे आज देश सेवा करत असताना वीरमरण आलेल्या अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असताना गिरीश महाजन यांना मोठी दुखापत झाली असून गंभीर जखमी झाली आहे. डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून ते पुढील दौऱ्यासाठी नाशिककडे रवाना झाले आहेत.

वरणगाव येथील वीरगती प्राप्त झालेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आज वरणगाव शहरात आले होते. वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव होत असतानाही गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. मात्र, डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केले. तसेच, काळजी करू नका देशसेवा करीत असतांना अर्जुनला वीरमरण आले याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवचन महाजन यांनी दिले. 

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागला असतांना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत ते चालत गेले, तिथे हजारो वरणगावकरांच्या उपस्थित मानवंदना दिली, त्यानंतर नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे, असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours