पुण्यात आंतर-विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आंतर-विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1 एप्रिल 2025 रोजी मंडल क्रीडा मैदान, ताडीवाला रोड, पुणे येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन महिला सामाजिक सेवा संघटना (WSSO), पुणे, मध्य रेल्वेच्या अध्यक्षा श्रीमती वर्मा तसेच उपाध्यक्ष श्रीमती गीता जाधव आणि संघटनेच्या इतर मान्यवर सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. मंडल रेल्वे व्यवस्थापक, पुणे श्री राजेश वर्मा यांनी पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांसह या सोहळ्याची शोभा वाढवली.

पहिला सामना विद्युत विभाग आणि कार्मिक विभाग यांच्यात खेळवण्यात आला. कार्मिक विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विद्युत विभागाने 8 षटकांत 35 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कार्मिक विभागाच्या संघाने 4.3 षटकांत विजय मिळवला.

सुश्री प्रियांका बोरा यांना “वूमन ऑफ द मॅच” म्हणून घोषित करण्यात आले आणि श्री. राजेश मीणा, वरिष्ठ डीएसटीई यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

ही स्पर्धा पुणे विभागातील महिला खेळाडूंची उत्कृष्ट कौशल्ये आणि त्यांचा खेळावरील उत्साह दर्शवणारी ठरली.

दिनांक: 1 एप्रिल, 2025
पीआर क्रमांक: 2025/04/01
ही प्रसिध्दीपत्रक मंडल जनसंपर्क विभाग, पुणे विभाग, मध्य रेल्वे यांनी जारी केले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours