डिपेक्स राज्यस्तरीय प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

पुणे, दि. ५ : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मैदानात डिपेक्स राज्यस्तरीय प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
राज्याच्या विविध भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांबाबत माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वागत समिती सचिव प्रसंजीत फडणवीस, स्वागत समिती अध्यक्ष प्रकाश धोका, स्वागत समिती निमंत्रक संकल्प फळ देसाई, अथर्व कुलकर्णी महाविद्यालयांचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी समाधान व्यक्त केले.
0000

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours