28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करावा:आयुक्त चित्रा कुलकर्णी

धुळे, दिनांक 11 एप्रिल, 2025  : नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतीमान व कालबद्ध पद्धतीने देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा राज्यात 28 एप्रिल, 2015 रोजी पारित करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीस दशकपूर्तीचे औचित्य साधुन नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात 28 एप्रिल, 2025 हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करावा. असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.

नाशिक विभागात 28 एप्रिल,2025 हा दिवस सेवा हक्क दिन साजरा करण्यासंदर्भात दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नगर विकास अधिकारी अभिजित बाविस्कर, आरटीएसचे नोडल अधिकारी राहुल वाघ यांच्यासह नाशिक विभागातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. कीत दिल्यात

आयुक्त चित्रा कुलकर्णी म्हणाल्या की, सर्व जिल्ह्यांत 28 एप्रिल, 2025 रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचे आयोजन करावे. त्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या प्रती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात याव्यात. तसेच कायद्याच्या ठळक तरतूदींचे वाचन करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत विहीत सूचना फलक यापुर्वी लावले नसल्यास तसे माहिती फलक लावावेत. सर्व कार्यालयात या दिवशी सकाळी 11 वाजता गावपातळीवर, तालुकास्तर, जिल्हास्तरावर सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून सेवा हक्क दिनाची शपथ देण्यात यावी. नवनवीन उपक्रम राबवून या कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, कार्यालयात, गर्दीच्या ठिकाणी, आठवडे बाजार, पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे इत्यादी ठिकाणी लोकसेवा हक्क अधिनियमांचे माहिती फलक क्यू आर कोड सह प्रदर्शित करावेत. समाज माध्यमावर या उपक्रमांची व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी. ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन, कोनशिला समारंभ आयोजित करावा. ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची सुरुवात करावी. लोकसेवा हक्कात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करावा. आपले सेवा केंद्र चालक, अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हक्क आयोग व आपले सरकार पोर्टल संदर्भात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करावे. पथनाट्य, नाटके, गाणी, लोककलांचा वापर करावा. जिल्ह्यात सेवादूत योजना सुरु करावी. असे विविध उपक्रम राबवून सेवा हक्क दिन साजरा करण्याचे निर्देश श्रीमती कुलकर्णी यांनी दिलेत.

विभागीय आयुक्त डॉ.गेडाम म्हणाले की, सर्व जिल्ह्यांनी सेवा हक्क अधिनियमाबाबत ठाणे, कोल्हापूर व यवतमाळ जिल्ह्यास भेटी व पाहणी करण्यासाठी नियोजन करुन तसे आदेश निर्गमित करावे. येत्या काळात ज्या सेवा अधिसूचित आहे. त्या सेवा कार्यान्वित कराव्यात, त्यांचा आढावा घेण्यास त्यांनी सांगितले.
00000

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours