वाळू तस्करी करणाऱ्या डंपरवर महसूल आणि पोलीस प्रशासनातर्फे कारवाई 

जामनेर 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अवैधपद्धतीने सुरू असलेल्या वाळू तस्करीवर अखेर जामनेर प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. अवैध पद्धतीने वाळू तस्करी करणाऱ्या एका डंपर वर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई काल 16 एप्रिल 2025 रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान सहा ब्रास वाळू आणि डंपर ताब्यात घेण्यात आले आहे.

तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून जामनेर तालुक्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रात्री अपरात्री अवैध पद्धतीने वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्याप्रमाणे जामनेर महसूल आणि पोलिस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे.  रात्रीच्या गस्तीमध्ये MH 04 HY 3645 नंबरचे 6 ब्रास वाळू घेऊन जाणाऱ्या डंपर वर ही कारवाई करण्यात आली आहे. हा डंपर पवार नावाच्या जळगावच्या व्यक्तीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करणारा डंपर नेरीहून जामनेर येत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याजवळ कोणतीही परवानगी नसल्याने कारवाईप्रमाणे डंपर वाळूसह ताब्यात घेण्यात आले आहे. डंपरवर दोन लाख रुपयांचा दंड आणि रेती असा एकूण पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. 

कारवाई पथक पुन्हा एक्टिव करणार – नानासाहेब आगळे 

शहराच्या हद्दीत अवैध पद्धतीने अवैध वाढूची वाहतूक त्याचबरोबर अवैध पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने जुन्या पथकांना रिवाईस करून पुन्हा एकदा कारवाई पथक ऍक्टिव्ह करण्यात येणार आहेत. त्यामुळे अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्यांना नक्कीच चाप बसण्यास मदत होणार आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours