जळगाव जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून वाळू उपसा बंद आहे. कारण वाळू गटांचे लिलाव झालेले नाहीत. असे असताना, काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात मात्र सर्रास वाळू तस्करी सुरू आहे. जामनेर तालुक्यामध्ये देखील नेरी मार्गे चिंचखेडा, केकतनिंभोरा जामनेर, माळपिंपरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. अशातच आज सकाळी जामनेर महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी वाळू घेऊन जाणारे ट्रक नेरी हून जामनेर च्या दिशेने येत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचून डंपरला रोखले होते. संबंधित चालकाकडे कागदपत्र आणि परवानगीची विचारणा केली असता कोणतेही परवाने किंवा कागदपत्रे नसल्याची माहिती डंपर चालकांनी दिली. त्यानंतर महसूल विभागाने डंपर चालकासह ताब्यात घेतला आहे. डंपर मध्ये साधारण सहा ब्रास वाळू म्हणजेच 20 ते 25 हजाराची वाळू आणि दोन लाख रुपये किमतीचे डंपर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या डंपर ला असलेला नंबर देखील पुसण्यात आला आहे. त्यामुळे हा डंपर नेमका कोणाचा आहे आणि अवैध वाळू तस्करी करणारा कोण याची अद्याप माहिती महसुल विभागाला प्राप्त झालेली नाही. महसूल विभागाकडून पंचनामा करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती नायाब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांनी दिली आहे.
गिरणा नदीतूनरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्रास अवैध वाळू उपसा आणि मुरूम चोरी सुरू असल्यामुळे त्यावर ना जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश आहे , ना पोलिसांचा. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे. त्यामुळे अशा अवैध वाळू तस्करांवर कठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
#देवेंद्रफडणवीस #Daily latest news today update #Jalgoan #Jamner #GirishMahajan #अवैध वाळू उपसा #महसूल #चंद्रशेखर बावनकुळे #जामनेर #जळगाव ताजी बातमी
+ There are no comments
Add yours