उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दंत तपासणी शिबिर संपन्न
दि. 27 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दंत तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. मा. सिव्हिल सर्जन डॉ. स्वप्निल सांगळे सर , मा. अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ.आकाश चौधरी सर तसेच बाह्य संपर्क अधिकारी डॉ. सुशांत सुपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरासाठी इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव शाखा तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पथकाचे सहकार्य लाभले. मा. डॉ. हर्षल चांदा वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांच्या नेतृत्वाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरात शालेय लाभार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. त्यातील 25 लाभार्थ्यांना पिट व फिशर सीलंट (Pit & Fissure Sealant) या प्रतिबंधात्मक उपचाराचा लाभ देण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना दातांच्या आरोग्याबाबत स्वच्छता, योग्य आहार आणि नियमित तपासणी याविषयी डॉ. आशिष महाजन यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय तसेच जामनेर शहरातील डेंटिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जितेंद्र वानखेडे यांनी केले सूत्रसंचालन डॉ.चंद्रमणी सुरवाडे यांनी केले व आभार डॉ.धनंजय पाटील यांनी मानले. याप्रसंगी आर बी एस के पथकातील डॉ.पंकज पाटील.डॉ.निलेश चव्हाण.डॉ. स्वाती विसपुते. डॉ.विजया पाटील.डॉ. कविता काळे.डॉ.हर्षाली गोसावी.हर्षा गवळे. मोनाली सावळे.अनिता बडगुजर.सलमा तडवी.सुनिता दवंगे, परमेश्वर पवार. अमोल सोनवणे इत्यादी उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours