जामनेरमध्ये जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियान; रविवारी भव्य उपक्रम

जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता या अभियानाची सुरुवात होणार असून सकाळी ७ ते १०.३० या वेळेत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत. शहरातील विविध भागांमध्ये स्वयंसेवकांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.

सदर अभियानाचे वृत्तांकन करण्यासाठी सर्व पत्रकार संघ व सार्वजनिक उत्सव मंडळांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून स्वच्छ आणि सुंदर जामनेर घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours