जामनेर तालुक्यातील वेंडर ने सावकारी कर्ज आणि जमिनीच्या व्यवहारातील वादातून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कैलास रघुनाथ सोनवणे (वय ५२) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावकारी कर्जाच्या व्यवहारातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोनवणे यांनी शुक्रवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये सावकारी व्यवहाराचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात ठिय्या देत न्यायाची मागणी केली. पोलिसांनी फिर्याद नोंदवण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यात आला. मात्र उशिरापर्यंत संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
+ There are no comments
Add yours