जामनेर : ट्रॅक्टर पलटून गेला 20 फूट खोल दरीत – चालकाचा मृत्यू 

जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबील होळ येथे रस्त्याने जाणारा ट्रॅक्टर अचानक पलटल्याने ट्रॅक्टर थेट 20 फूट खोल दरीत गेला. या दुर्चालकाच्या जागी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी साधारण चार वाजेच्या सुरात घडली आहे. गुलाब जेमा चव्हाण (वय 35, रा.आंबील होळ ता. जामनेर) असं मयत व्यक्तीचे नाव आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहिती अनुसार, आज दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर चालक गुलाब चव्हाण  ट्रॅक्टर घेऊन MIDC खादगाव ते आंबीलहोळ रस्त्याने जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. आणि ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर ट्रॅक्टर चालक 20 फूट खोल दरीत पडला, आणि त्यानंतर ट्रॅक्टर त्याच्या वर पडल्याने गुलाब चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 अपघात झाल्याची माहिती मिळताच जामनेर चे आरोग्य दूत जालमसिंग राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुलाब चव्हाण यांना उपजिल्हा रुग्णालय जामनेर या ठिकाणी दाखल केले आहे. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या डॉक्टरांनी घोषित केले.

गुलाब चव्हाण यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours