कौटुंबिक वाद अन पित्यानेच केला मुलाचा घात

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे फत्तेपुर मधील  कसबा पिंप्री गावात 25 वर्षीय विवाहीत तरुणाची हत्या त्याच्याच जन्मदात्या पित्याने केल्याचं सष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. शुभम धनराज सुरळकर(25,कसबा पिंपरी) अस मयत तरुणाचे नाव आहे. तर धनराज सुपडू सुरळकर (वडील) ,गौरव धनराज सुरळकर (भाऊ) आणि हरीलाल सुपडू सुरळकर (काका) अशी आरोपींची नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कसबा पिंप्री येथील पंचवीस वर्षीय शुभम धनराज सुरळकर याचा मृतदेह गावापासून १किमी अंतरावर शे.करीम शे. रऊफ यांच्या शेताजवळ आढळल्याची माहिती दि. २२ जून 25 रोजी सकाळचे सुमारास पोलीस पाटील समद तडवी यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळ गाठले . मृतदेह ताब्यात घेत निरीक्षण केल्यानंतर मयत तरुणाच्या डोक्याला जबर मार लागलेला होता.  मृतदेह घटनास्थळीआणून टाकल्याचा त्यांना संशय आला त्यांनी पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांना गुन्हाची माहिती दिली त्यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप पाटील पो.उपनिरीक्षक डोमळे व कर्मचारी त्याच प्रमाणे श्वानपथक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेचे पथक घटनास्थळी दाखल झाले
पोलिसांनी आपल्या परीने तपासाची दिशा ठरविली त्यानुसार मृत शुभम याला दारूचे व्यसन होते मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणावरून घरात सातत्याने भांडण करायचा त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती त्याच्या त्रासाला संपूर्ण कुटुंबीय कंटाळले होते दि.२१ जून च्या रात्री तो घरात झोपलेला असतांना त्याचे वडिल धनराज सुपडू सुरळकर यांनी रागाच्या भरात मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकला यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मुलाचा मृतदेह गावापासून १ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला तपासात आरोपी निष्पन्न झाल्याने धनराज सुरळकर यास अटक करून भारतीय न्याय संहिता कलम १०३ / १ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहे गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पहूर व जामनेर येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्याचे हेड काँ. प्रविण चौधरी गणी तडवी, मुकेश पाटील,चेतन कांगळे ठाण मांडून आहेत

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours