जामनेर मध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या! 

जामनेर 

जामनेर शहरांमध्ये एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पाटील वाडी या परिसरात घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवार दिनांक 17 नोहेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. विद्यार्थी हा आठवी इयत्तेत शिकत होता. आज दुपारी अल्पवयीन आपल्या घरात एकटाच होता. त्याचे आई-वडील बाहेर गेलेले होते. घरी परतल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याची घटना उघडकी झाली. त्यानंतर लागलीच ही माहिती जामनेर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. 

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे की, त्याची कुणी हत्या केली आहे असा संशय प्राथमिक तपासात निर्माण होत आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours