जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, वार्ड क्रमांक 12-ब सर्वसाधारण महिला राखीव या प्रभागातून सौ. स्वामिनी जगदीश भामरे (सोनार) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाकडून हा अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. सौ. भामरे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात भाजपकडून निवडणूक लढविण्याची प्रक्रिया अधिकृत झाली असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.
यावेळी त्यांच्या समर्थकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. सौ. स्वामिनी भामरे या जगदीश बाबुराव भामरे यांच्या अर्धांगिनी असून, सामाजिक कार्यात त्यांची उल्लेखनीय ओळख असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नगरपरिषद निवडणुकीची राजकीय तापटता वाढत असतानाच या उमेदवारीमुळे वार्ड 12-ब मध्ये चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
+ There are no comments
Add yours