शहरातील सीसीटीव्ही बंद – नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
जामनेर शहरात आज अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर भाजी विक्रेत्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने अतिक्रमणाचा मुद्दा पेटला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , जामनेर शहरात मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठ परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात भाजी आणि फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर नगरपालिका चौकात रिक्षा चालक देखील आपल्या रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. आज अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी विजय सपकाळे हे पथकासह गेल्यानंतर भाजी विक्रेत्यांनी त्यांच्यावर पाईपाने हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली.
बाजारपेठेतील फळ विक्रेत्यांचा म्हणणं आहे की, अतिक्रमण काढताना विजय सपकाळे यांनी भाज्यांच्या गाड्या पलटी केल्या. ज्यामुळे काही विक्रेत्यांचे नुकसान झाले. ज्यामुळे संतप्त विक्रेत्यांची विजय सपकाळे यांच्यासोबत बाचाबाची झाली.
सदर घटनेनंतर विजय सपकाळे यांनी पोलिसात धाव घेतली असून संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी दिली आहे.
शहरातील सीसीटीव्ही बंद
जामनेर नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक सीसीटीव्ही हे फक्त नावापुरते दर्शनी भागात लावलेले आहेत. गेल्या अनेक महिने आणि वर्षांपासून हे सर्व सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. शहरात मागील अनेक महिन्यांमध्ये चोऱ्या आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. मात्र शहरात लागलेले हे सीसीटीव्ही फक्त शो बाजी पुरते उरले आहे. ज्यामुळे जामनेर शहरातील नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. कोट्यावधीचा जमा होणारा टॅक्स नगरपालिका नेमका खर्च करते कुठे असा यामुळे प्रश्न निर्माण होत आहे.
+ There are no comments
Add yours