जामनेर प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री विष्णू काळे यांची तात्काळ बदली करा -मनसेची मागणी

जामनेर प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री विष्णू काळे यांची तात्काळ बदली करा – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

आज 30 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उप शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जामनेर येथून रावेर येथे बदली झालेले श्री विष्णू वामन काळे यांच्याकडून जामनेर प्रभारी गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढून घेणे बाबत निवेदन देण्यात आले.


जामनेर येथे कार्यरत असलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक श्री विष्णू वामन काळे यांची 13 मे 2025 रोजी जामनेर येथून रावेर येथे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती मात्र अद्यापही श्री विष्णू काळे यांनी आपला पदभार जामनेर येथून सोडलेला नाही. रावेर येथील पूर्ण वेळ पदाचा कारभार न पाहता जामनेर येथील अतिरिक्त पदभार स्वीकारण्यात इतके स्वारस्य का? असा प्रश्न जामनेर तालुक्यात शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनला आहे कारण गेल्या 10 ते 12 वर्ष जामनेर तालुक्यात ठाण मांडून बसलेले श्री विष्णू काळे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे. असा सवाल निर्माण होत आहे.
गेल्या 15 दिवसापूर्वी श्री विष्णू काळे यांची जामनेर गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. मात्र जामनेर तालुक्यात नावीन्य पूर्ण व पात्रता असलेले तीन – तीन कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना रावेर येथे नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार कोणत्या अनुषंगाने देण्यात आला याबद्दल जामनेर तालुका अनभिज्ञ आहे. तालुक्यातील तिन्ही कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी हा पदभार स्वीकारण्यास पात्र असताना व संबंधित शिक्षण खात्याचा कारभार पाहण्यासाठी सक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना इतर तालुक्यात बदली करण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर ही कृपादृष्टी तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. तरी जामनेर येथील विद्यमान प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री . विष्णू वामन काळे यांची जामनेर येथून तात्काळ उचल बांगळी करून त्यांना रावेर येथील पदभार देण्यात यावा व जामनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी यापैकी एका सक्षम व कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी यांची अतिरिक्त गट शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे . असं न घडल्यास बदली या संकल्पनेवर कर्मचारी व अधिकारी यांचा विश्वास राहणार नाही तो विश्वास उडेल म्हणून आपण ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या “क” व “ड” श्रेणीतील कर्मचारी बदली प्रक्रियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणताही वशिला व आकस मनात न ठेवता, बदली प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर तालुका मनसे स्टाईल ने कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे , तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , वाल्मीक कोळी , जगदीश कुरकुरे , रतन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours