जामनेर – पाचोरा बस प्रवासात महिलेची ४ ग्राम सोन्याची चैन चोरी

जामनेर बस स्थानक परिसरातून निघालेल्या जामनेर ते पाचोरा मार्गावरील एस.टी. बसमध्ये प्रवास करणाऱ्या रुपाली अनिल गव्हाळ (रा. गोंदेगाव ता.जामनेर) या महिलेची सोन्याची चैन चोरीची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अंदाजे ४ वाजता रुपाली गव्हाळ जामनेर येथून पाचोरा जाण्यासाठी बसमध्ये चढल्या. बस स्थानकातून सुटल्यावर काही अंतरावरच गर्दीच्या गोंधळात त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ ग्राम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने ओढून नेली. ज्याची किंमत जवळपास 35 ते 40 हजार आहे.

घटनेची जाणीव महिलेला होताच त्यांनी बसचालक व वाहकाला माहिती दिली. तातडीने पोलिस ठाण्यासमोरच बस थांबवून शोध घेण्यात आला, मात्र तो पर्यंत चोरटा फरार झाला होता.

या प्रकरणी रुपाली गव्हाळ यांनी जामनेर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, बस प्रवाशांना गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बस स्थानक बनले चोरट्यांचे आगार 

जामनेर बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यासह बॅगा व खिशातून मोबाईल, पैसे लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून हे बसस्थानक चोरट्यांचे आगार बनले आहे. महामंडळाचे सुरक्षा रक्षक असो की पोलीस नावालाच असून या दोन्ही यंत्रणा पुरेशी खबरदारी घेत नसल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours