जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम तरुणाला काही अज्ञात व्यक्तींकडून जबर मारहाण केली गेली, ज्यामध्ये मुस्लिम तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज दुपारी घडली असून जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुलेमान रहीम खाँ पठाण (वय 20,राहणार छोटी बेटावद जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील छोटी बेटावद येथील राहणाऱ्या सुलेमान खान हा मुस्लिम तरुण आज सकाळी काही कामानिमित्त जामनेर येथे आला होता. मात्र अचानक मुस्लिम तरुणाला जामनेर मधील एका कॅफेत काही अज्ञात तरुणांनी जबर मारहाण केली, त्यानंतर मुस्लिम तरुणाला परत त्याच्या गावी जाऊन त्याला मारहाण केली, सदर तरुणाच्या आई-वडिलांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केली त्यांना देखील काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामा राणी मध्ये मुस्लिम तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर तरुणाला मारहाण का आणि कुणी केली याचा तपास जामनेर पोलीस करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जामनेर पोलीस ठाण्याला भेट देत घटना माहिती करून घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुस्लिम मुलाला हिंदू तरुणांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र हा सर्व प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे अद्याप गुलदस्तात आहे. घटनेनंतर जामनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायाचे लोक जमा झाले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटनेची सविस्तर माहिती थोड्याच वेळात. ……….
+ There are no comments
Add yours