“जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी गावात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन”

कसबा पिंपरी (ता. जामनेर) :
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी या गावात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ या अभिनव उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गावकऱ्यांच्या एकतेतून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिष्ठापना या उपक्रमामागे पर्यावरण संरक्षण, खर्चात बचत, तसेच सामाजिक सलोखा वाढवण्याचा उद्देश होता.

गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळाच्या चौक परिसरात पारंपरिक विधीने करण्यात आली. दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालगोपाळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी देखील उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळे, महिला बचतगट,सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपापले मतभेद विसरून हा उपक्रम राबवला, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

ग्रामस्थांचा प्रतिसाद :
ग्रामस्थ यांनी सांगितले की, “गावात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच सामाजिक ऐक्य वाढावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला.

या उपक्रमामुळे अनावश्यक खर्च टाळून, समाजिक ऐक्य व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा एक आदर्शच उभा राहिला असून, इतर गावांनीही या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या उपक्रमाची माहिती मंडळाचे अध्यक्ष,व अनुलोमचे अनुलोम मित्र प्रेम इंगळे यांच्यामध्यमातून अनुलोम संस्थेला माहिती मिळाल्यानंतर ,अनुलोमचे भाग जनसेवक यांनी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना कळविल्यानंतर ,साहेबांनी त्याचा सत्कार आपण नक्की करूत ,त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आमंत्रण दिले होते ,तेव्हा मंडळाचे अध्यक्ष
अध्यक्ष प्रेम इंगळे,विशाल चौधरी,कार्तिक सपतोल,दीपक माळी,मनीष चौधरी,पंकज चौधरी,रुपेश बागुल,कुणाल चौधरी,आदेश चौधरी,संभाजी चौधरी,मोहन चौधरी,ओम दुडे,सुमित राऊत,प्रथमेश चौधरी,अक्षय लोहार,पवन लवंगे ,दिनेश लवंगे संकेत लोहार
सोबत अनुलोम मित्र कमलेश चौधरी महाराज ,भावेश चौधरी होते

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours