जामनेर येथे 37शिक्षक व 4 समाजसेवी यांचा केला सत्कार – भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

जामनेर – जिवन कसे जगावे हे शिक्षक शिकवितात – प्रा.चंद्रकांत डागा-
जामनेर(वा.)- शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर सामाजिक व कौटुंबिक समज देऊन जिवन कसे जगावे याचे मार्गदर्शन ही शिक्षक करतात असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष निवृत्त प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.ते येथील महावीर भवनमध्ये संघटनेच्या गुरू दक्षिणा फाउंडेशन कार्यक्रम अंतर्गत शिक्षा सारथी सन्मान सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन ओसवाल संघाचे अध्यक्ष व प्रायोजक ईश्वरलाल कोठारी होते.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्र व सरस्वती पूजनाने झाली. एकूण 37शिक्षक व 4समाजसेवी यांचा सत्कार केला गेला.
प्रा.डागा म्हणाले, शिक्षक दिननिमित्त आमच्या,आमच्या मुलांचा,आचार्यांचा,आई- वडिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस.त्यांना बोलवून त्यांचा सन्मान करणे, त्यांचे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेणे व पुढील पिढीला गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण यातुन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.प्रा.डागा संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल्स,नव दंपत्ती सक्षमीकरण, दिल का जिगशॉ,परिणय पथ, एमएसएमई,अल्पसंख्याक कार्यशाळा, ईडब्ल्यूएस,कौटुंबिक लवाद आदि चालत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन,ते राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जामनेर ता.एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धाडीवाल म्हणाले, गुरू शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जिवन नाही. अध्यापन हे विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे. जे पडद्यामागे कार्य करतात अशा व्यक्तींना शोधून समाजापुढे आणले पाहिजे.महिला जिल्हाध्यक्ष सोनल कोठारी,शिक्षक विजय सेतवाल,उमेश बेदमुथा, संजय भुरट यांनी मनोगत व्यक्त केले.
**या शिक्षकांचा झाला सन्मान
रामचंद्र सैतवाल,सुदर्शन सैतवाल,प्रिती संघई,नितीन सैतवाल मिलिंद वास्कर, अनंत अरतकर,प्रा.राहुल शिंपी,अजय जैन,आरती सुदर्शन सैतवाल,शिल्पा कारंजकर, संदीप वाशिमकर,कविता वाशिमकर,तुषार जैन,निकिता अरतकर,रोहिणी शिंपी, कोमल चतुर,निकिता सुर्यवंशी,मंदाकिनी छाजेड, छगणलाल छाजेड, डॉ.दिपक सिसोदिया
मनीषा कोठारी,वंदना चोरडिया,आरती लोढा, मयूर भुरट,रूपल भुरट,मयूर संकलेचा,अतुल साबद्रा,सविता बोहरा,
डॉ श्वेता राका,उमेशजी बेदमुथा,रीना चंडालिया, सारिका चोपडा,दिपाली चोरडिया,सोनाली सिसोदिया,ईश्वर चोरडिया,संजय भुरट,प्रा.चंद्रकांत डागा
समाजसेवी ईश्वरलाल साबद्रा,महेंद्र नवलखा,प्रकाश सैतवाल,पारस ललवाणी आदींचा सत्कार शाल,सन्मानपत्र व माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.सोनाली सिसोदिया तर आभारप्रदर्शन सचिन चोपडा यांनी केले.ओसवाल संघाचे मंत्री डॉ.कांतीलाल ओसवाल,संघटनेचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा,सचिव संकल्प लोढा,सह सचिव आदित्य मंडलेचा, उपाध्यक्ष दर्शन भुरट,महिला सदस्य भावना बोहरा,प्रोजेक्ट हेड विकास ललवाणी,वैभव छाजेड,सौ मनिषा कोठारी,सौ वंदना चोरडिया आदी सदस्य उपस्थित होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours